एक जुनी म्हण आहे की – ‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते –न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’. तीच गोष्ट लागू पडते जाहिरातीला , वेबसाईटला.
आता स्मार्टफोनच्या, फेसबुकच्या, व्हाट्सएपच्या दुनियेत आपण अनेक वेबसाईट्स पाहतो. आज आपण इंटरनेटवर कपडे, इतर वस्तू खरेदीही करतो. आज तुमचीही वेबसाईट इंटरनेटवर असेल. जर नसेल तर तुम्ही जरूर प्रसारित करा. तथापि या सर्वात आपल्याला हे पाहायचे आहे कि वेबसाईटद्वारे तुम्ही व्यवसाय कसा वाढवू शकता. त्याचे रहस्य ध्यानात घेऊन मग आपणही वेबसाईट्चा उपयोग आपला व्यवसाय जगभर वाढवण्यासाठी उत्तम तर्हेने करू शकतो.
वेबसाईट हे माध्यम आता प्रत्येकासाठी
सर्वप्रथम हे समजून घेऊयात की वेबसाईट आज प्रत्येकास कशी उपयोगी आहे . वेगवेगळ्या कंपन्यांना, हॉस्पिटल्सना, शोरूम्सना, हॉटेल्सना, आर्किटेक्ट्सना, बिल्डर्सना वेबसाईट उपयोगी आहेच. तसेच शैक्षणिक क्लासेस, सामाजिक संस्थांनाही वेबसाईट उपयोगी आहे. एवढेच नव्हे तर एखादा तबला वादक, गायक, चित्रकार, समाजकार्य करणारी व्यक्ती, धार्मिक पूजा अर्चा करणारा पुरोहित सुद्धा त्याची वैयक्तिक वेबसाईट प्रसिद्ध करू शकतो. याशिवाय एखाद्या विषयावर तुमचे विचार व्यक्त करणारी वेबसाईटही तुम्ही करू शकता. आज वेबसाईट हे साऱ्या जगाला तुमची माहिती देणारे उत्तम माध्यम आहे .
वेबसाईट हे माध्यम खर्चिक आहे का ?
वेबसाईट हे माध्यम खर्चिक मुळीच नाही. तुम्ही आपली मूलभूत माहिती देणारी वेबसाईट अगदी वाजवी खर्चात करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या वेबसाईटचे नाव आधी रजिस्टर करावे लागते. त्यानंतर वेबसाईटचे डिझाईन तुम्ही आकर्षक पद्धतीने करून घेऊ शकता – त्यात फोटो, माहिती देऊ शकता. आणखी थोड्या खर्चात व्हिडिओदेखील करू शकता व तो वेबसाईटवर प्रसारित करू शकता.
वेबसाईट प्रभावी होण्यासाठी – डिझाईन व तांत्रिक द्रुष्टीने कशी हवी ?
आज मार्केटमध्ये वेबसाईट डिझाईन करणाऱ्या अनेक एजन्सीज आहेत – तिचे डिझाईन फक्त चांगले असणे पुरेसे नाही – ती इंटरनेटवरील आवश्यक तांत्रिक बाबीचा विचार करून नियोजन केलेली असली पाहिजे.
सुयोग्य पद्धतीने प्रभावी वेबसाईट करण्यासाठी काही निकष आपण ध्यानात घ्यावयास हवे – ते असे :
- वेबसाईटचे डिझाईन – हे तुमच्या व्यवसायाची माहिती देणाऱ्या शब्द व चित्राचा योग्य समन्वय असते. ते साधे, समजण्यास सोपे, आकर्षक व थोडक्यात माहिती देणारे असावे. हे काम डिझाईनर्सचे आहे. त्यांना जाहिरातकलेचे, विक्रीकलेचे ज्ञान हवे .
- तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण वेबसाईट – डिझाईननंतर महत्वाचा भाग आहे तंत्राचा. हे काम आहे साईट डेव्हलपरचे – प्रोग्रामरचे ! त्यांना इंटरनेटवरील नवनवीन तंत्रांचे, बदलत्या प्रवाहांचे ज्ञान हवे. उत्तम डेव्हलप केलेली वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह असते – याचा अर्थ ती कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर लगेच दिसू लागते – उत्तम दिसते व लगेच डाऊन्लोड होते. ती दिसण्यास वेळ लागत असेल तर पाहणारा कंटाळून दुसऱ्या वेबसाईटकडे वळू शकतो – येथे तुमची माहिती मग त्यापर्यंत पोहोचत नाही.
तुमच्या वेबसाईटचा जगभर प्रसार
वेबसाईट हे माध्यम जगाच्या कोणत्याही भागात २४ तास, आठवड्याचे सातही दिवस –वर्षभर, कायम दिसू शकते. तुम्ही विशिष्ट कार्यप्रणाली वापरून वेबसाईट हव्या त्या लोकांपर्यंत – तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या वेबसाईटबद्धल ऐकले तरच लोक ते पाहतील व तुम्हाला त्याचा फायदा होईल. यासाठी Search Engine Optimization अशी प्रणाली करता येते. याद्वारे गुगलवर तुम्ही संबंधित विषय शोधताना तुमची साईट अग्रक्रमाने दिसते.
यामुळे तुमच्या साईटकडे लक्ष वेधले जाते व तुमची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचते. ही प्रणाली तुम्हाला तुमचे शहर, देश किंवा जगाच्या विशिष्ट भागासाठीही करता येते. यामुळे तुम्ही मार्केटिंगची उद्दीष्टे प्रभावीपणे साध्य करू शकता– थोडक्यात त्यांच्यापर्यंतच पोहोचा ज्यांना संपर्क करणे तुमच्या फायद्याचे आहे.
जर तुम्हाला तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपला व्यवसाय किंवा थोडक्यात आपला ब्रँड हा सर्वदूर पोचवायचा असेल आणि आपले व्यावसायिक उद्दिष्ट प्राप्त करायचे असेल तर, आजच भेट द्या Bright Pixel या वेबसाइटला. ही कंपनी पुण्यातील प्रभावी व अग्रेसर वेबसाईट डिझाईन व डेव्हलपमेंट एजन्सी आहे. या एजन्सीने इंजिनीरिंग, सौन्दर्यप्रसाधने, क्लोथिंग ब्रँड, बिल्डर्स, फिल्म -अॅनिमेशन इंडस्ट्री तसेच चित्रकार, फोटोग्राफर आणि अनेक कलाकार यांच्या 200 हुन अधिक विविध डिझाईनच्या तंत्रदृष्ट्या परिपूर्ण वेबसाईट केल्या आहेत.
Bright Pixel Web Designing Agency In Pune विविध काम पाहण्यासाठी त्यांची वेबसाईट जरूर पहा. आमच्याशी या विषयावर केंव्हाही तुम्ही बोलू शकता – तुमचे स्वागतच आहे.
0 Comments
Leave a comment